Saturday, February 15, 2025
HomeदेशBudget 2025 : १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; करदात्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा!

Budget 2025 : १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; करदात्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा!

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी (Budget 2025) आनंदाची बातमी दिली आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना हे मोठं गिफ्ट देण्यात आले आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमर्गींना दिलासा देण्यासंदर्भात संकेत दिले होते. १२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ८० हजारांपर्यंत फायदा होणार आहे. तर १२ लाख ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारला जाणार आहे.

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ Live

यामुळे वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला ८० हजार रुपयांची करात सूट मिळेल. याचा अर्थ, त्याचा १०० टक्के कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा फायदा होईल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर कमी होईल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा १ लाख २५ हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला २५ टक्के कर कमी भरावा लागेल.

नव्या करप्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असल्यास आयकर भरावा लागणार नाही.

तर जुन्या करप्रणालीनुसार अशी असेल कर रचना…

  • ० ते ४ लाखांवर कर नाही
  • ४ ते ८ लाखांवर ५ टक्के कर
  • ८ ते १२ लाखांवर १० टक्के कर
  • १२ ते १६ लाखांवर १५ टक्के कर
  • १६ ते २० लाखांवर २० टक्के कर
  • २० ते २४ लाखांवर २० टक्के कर
  • २४ लाखांच्या पुढे ३० टक्के कर

ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखांपर्यंत वाढवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -