
वॉशिंग्टन डी.सी : अमेरिका येथील वॉशिंग्टन डीसीमधील पेनसिल्व्हेनियामध्ये दोन दिवसांपूर्वी विमान कोसळून मोठी घटना घडली होती. (US Plane Crash) अमेरिकेतील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत फिलाडेल्फियामध्ये विमान कोसळले आहे. या घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांना आग लागली आहे. (Plane Crashes In Philadelphia)

मुंबई : मध्यरेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या ( दि.२) मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि ...
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळापासून सुमारे ४.८ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. अपघाती विमानात दोन जण प्रवास करत होते. विमान १,६०० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर जवळपास ३० सेकंदांनी हे विमान अनेक घरांवर आदळले. यामुळे अनेक घरांना आग लागली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही अपघाताचे कारण समोर आले नाही. तसेच या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (US Plane Crash)