Mumbai Flower Festival : राणीच्या बागेत फ्लॉवर फेस्टिव्हलला प्रारंभ! तीन दिवस बहरणार पुष्पोत्सव

२८ वा मुंबई फ्लॉवर शोचा मुंबईकरांनी आनंद घेण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहन


मुंबई : मुंबई पुष्पोत्सवाची मुंबईकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यापार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही भायखळा येथील जिजामाता उद्यानात 'मुंबई पुष्पोत्सव' (Mumbai Flower Festival) सुरु करण्यात आला आहे. भारताची राष्ट्रीय प्रतिके फुलांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे हा यंदाचा ‘मुंबई पुष्पोत्सव’ अर्थातच वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामागची संकल्पना आहे. यंदाच्या प्रदर्शनात फुलझाडांसह वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, औषधी-सुगंधी वनस्पती, वेली तसेच भाजीपाला, मसाल्यांची रोपे मांडण्यात आली आहेत. अत्यंत कष्टाने आणि प्रतिभेने हे प्रदर्शन सजविले आहे. मुंबईकरांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.



पालिका, वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे मुंबई पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे. पालिकायुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते नुकतेच पुष्पोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, फुलांना पाहून कोणलाही उल्हासित वाटते. या पुष्पोत्सवातून हा हेतू साध्य होणार आहे. याचबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक संपदेचे जतन कसे करावे, त्याची कशी काळजी घ्यावी, त्याबाबत कोणती माहिती आपल्याकडे हवी, यासाठी देखील हे प्रदर्शन मुंबईकरांसह पर्यटकांना उपयोगी ठरणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱया या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.



यंदाचे विशेष राष्ट्रीय प्रतिकांचे आकर्षक सादरीकरण


शनिवारी, रविवार सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत पुष्पोत्सव सगळ्यांसाठी खुले राहाणार आहे. मुंबई पुष्पोत्सवाच्या यंदाच्या संकल्पनेत भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून भारताच्या प्रतिकांचे दर्शन घडविण्यात आले. झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी साकारलेला तिरंगा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतोय. भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती लाकडी कलाकृतीच्या माध्यमातून साकारली आहे. राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याची रचना झेंडूच्या फुलांनी तयार केली. राष्ट्रीय जलचर असलेले गंगा डॉल्फिन पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या शेवंतीच्या फुलांनी साकारले आहे. यासह कमळ, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय वृक्ष वड, अशोक स्तंभ, गंगा नदी, मोर आदी प्रतिकेही मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. बागेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे, खतांचेही प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. तसेच निवडुंग प्रजातींचे प्रदर्शनही आहे. तसेच वेगवेगळ्या बोन्साय प्रजातींची आकर्षक मांडणी, औषधी वनस्पती, क्रेप पेपरच्या फुलांचे प्रदर्शन आणि सेल्फी पॉइंटही साकारण्यात आला आहे. पुष्पोत्सवात देशी-विदेशी रोपांची विक्रीसाठी दालने खुली करण्यात आली आहेत. तसेच कृषी साहित्य, कीटकनाशके, फवारणी यंत्रे आणि शेतीसंबंधित साधनांचेही खरेदी-विक्रीची ५० हून अधिक दालने आहेत.


या उत्सवात मुंबई आणि उपनगरांतील शाळांच्या सहली देखील भेट देतात. पर्यावरणाचे अभ्यासक, छायाचित्रकारही या प्रदर्शनासाठी उत्सूक असतात. आज उद्घाटनाच्या दिवशीच हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. अनेकांनी राष्ट्रीय प्रतिकांच्या संकल्पनेचे कौतुक केले, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. (Mumbai Flower Festival)

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Harbour Line Block : हार्बर मार्गावर चार दिवस मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक

काही लोकल सेवा रद्द; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे

Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरकरांचा पाणीप्रश्न मिटणार

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई (Mumbai): छत्रपती संभाजीनगर

Mumbai Crime Branch : मुंबईत बनावट दुधाचा मोठा भांडाफोड; ५७५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

गोरेगाव पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, दोघांना अटक मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने गोरेगाव (Goregaon) पश्चिम

Chandrashekhar Bawankule : वसईतील कोळीवाड्यांना 'गावठाण'चा दर्जा मिळणार

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; कोळीवाड्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची