मुंबई: आम्ही तुम्हाला जिओच्या खास रिचार्ज प्लान्सबद्दल सांगत आहोत. यात युजर्सला फ्रीमध्ये नेटफ्लिक्स मिळणार आहे. जिओ पोर्टलवर लिस्टेड डिटेल्सनुसार येथे युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे.
जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळत आहे. यात डेटा आणि एसएमएसची सुविधाही मिळते. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १२९९ रूपये आहे. यात अनेक अॅप्स तुम्हाला कॉम्प्लिमेंट्री मिळतात.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल, एसटिडी कॉलचा समावेश आहे. या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएसचा अॅक्सेस मिळेल.
यात २ जीबी डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल. या प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा वापरण्यास मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला नेटफ्लिक्सचा अॅक्सेस मिळेल. तसेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडही वापरण्यास मिळेल.