India’s AI Model : भारत स्वतःचे जनरेटिव्ह-एआय मॉडेल बनवणार

Share

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : चीनच्या डीपसीक एआय मॉडेलने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेचे चॅट-जीपीटी देखील आधीपासूनच चर्चेत आहे. याच मालिकेत आता भारत देखील स्वतःचे जनरेटिव्ह-एआय मॉडेल विकसीत करण्याची तयारी करीत आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. भारताच्या एआय मॉडेलसमोर चॅट जीपीटी, ओपन-एआय, डीपसीक सारख्या जगातील स्वस्त एआय मॉडेलचे आव्हान असेल.

उत्कर्ष ओडिशा कॉन्क्लेव्हमध्ये भारताच्या जनरेटिव्ह-एआयची घोषणा करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, आपल्याकडे किमान ६प्रमुख डेव्हलपर्स आहेत जे बाह्य मर्यादेवर ६ ते ८ महिन्यांत एआय मॉडेल विकसित करू शकतात आणि यासाठी अधिक आशावादी अंदाजानुसार यासाठी ४ ते ६ महिने लागू शकतात. एक मजबूत एआय इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक सामान्य संगणकीय सुविधा हा सर्वात महत्वाचा घटक आहे असे वैष्णव यांनी सांगितले. त्यांनी यावेळी संशोधक, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांना एआय विकसित करण्यास चालना देण्यासाठी उच्च दर्जाच्या संगणकीय पायाभूत सुविधांची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर भर दिला. इंडिया एआय मिशनचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सामायिक संगणकीय संसाधन स्थापनेस प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. नुकतीच चीनच्या एका नवीन एआय मॉडेलच्या एंट्रीने जगभरात खळबळ उडवून दिली. चीनचे एआय स्टार्टअप डीपसीक-आर१ ने एक स्वस्त एआय मॉडेल आणले आहे. काही वेळातच डीपसीक आर१ चॅटबॉट ॲपने जगभरातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, १० जानेवारी रोजी लाँच झालेले डीपसीक-व्ही३ मॉडेलमध्ये प्रशिक्षणादरम्यान Nvidia च्या कमी क्षमतेच्या एच८०० चिप्सचा वापर करण्यात आला. त्यासाठी ६० लाख डॉलरपेक्षा कमी खर्च केला. गेल्या आठवड्यात रिलीज करण्यात आलेले डीपसीक-आर१ मॉडेल हे कामाच्या बाबतीत वापरण्यास ओपनएआय ०१च्या मॉडेलपेक्षा २० ते ५० पट स्वस्त आहे, असे डीपसीकच्या अधिकृत वी-चॅट अकाउंटवरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

44 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago