Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान म्हणाले...

दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दोघेही दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत, लाडकी बहीण योजनेबाबत, वाढत्या GBS व्हायरस बद्दल आणि बुलढाण्यातील केस गळती समस्येबाबत अनेक प्रश्न विचारले.




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी साहित्य संमेलनाबाबत काय म्हणाले?


" मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर देशाच्या राजधानीत होणारं साहित्य संमेलन जगभरातील मराठी माणसांकरिता अभिमानाची बाब आहे. विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल असा माझा विश्वास आहे. या संमेलनासाठी ७० लोकांची टीम कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या संमेलनात येण्यासाठी होकार दर्शवला आहे. या संमेलनाकरता कुठलीही अधिकची मदत लागल्यास ती निच्छितपणे देण्यात येईल. हे संमेलन कोण्याएकाच नसून तमाम मराठी बांधवांचं आहे."



पुढे फडणवीस म्हणाले, "प्रयागराजमध्ये घडलेल्या घटनांचा मी आढावा घेतला आहे. तिथे अडकलेल्या लोकांशी माझं बोलणं झालं असून उत्तर प्रदेशातील सरकारने माझ्याशी समन्वय साधला आहे. धनंजय मुंडे आणि माझी भेट हा योगायोग आहे. आम्ही दोघेही आमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आलो आहोत. धनंजय मुंडे हे आमचे मंत्री आहेत त्यांना भेटायची चोरी नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित दादांची भूमिका ही अधिकृत आहे.पुण्यात उदभवलेल्या वाढत्या GBS व्हायरसचे रुग्ण पहिल्यांदा आढळलेले नाही यापूर्वीही आढळले आहेत. नांदेड भागात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमागे विहिरीतील दूषित पाणी आहे. लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये आढळून आलेल्या अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येईल तसेच त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे याबाबत सक्रिय आहेत."



दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यादरम्यान आता पुढे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट