उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. घरकामापासून ते हॉटेलमध्ये सेवा देण्यापर्यंत रोबोट्सचा वापर वाढला आहे. परंतु, मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात तंत्रज्ञानाचा असा एक अनोखा प्रयोग पाहायला मिळाला, ज्याची सध्या संपूर्ण सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. उज्जैनमधील एका नवीन सँडविच दुकानाच्या उद्घाटनासाठी दुकान मालकाने कोणत्याही नेत्याला किंवा अभिनेत्याला न बोलवता चक्क एका 'ह्युमनॉईड रोबोट'ला VIP पाहुणा (Robot VVIP entry) (Special Guest) म्हणून आमंत्रित केले.
बाउन्सर्सची सुरक्षा अन् पारंपरिक स्वागत!
Inauguration of sandwich shop, Ujjain Madhya Pradesh pic.twitter.com/D5658yA30s
— NiLAY 📸 (@NilayPhotos) August 23, 2026
उज्जैन हे धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते, मात्र याच शहरात आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय परंपरेचा एक अद्भुत संगम पाहायला मिळाला. उद्घाटनाच्या वेळी दोन धिप्पाड बाउन्सर्सच्या सुरक्षेत रोबोटची ग्रँड एंट्री झाली. रोबोट दुकानाबाहेर पोहोचताच उपस्थितांनी त्याचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. भारतीय संस्कृतीनुसार दुकान मालकांनी रोबोटच्या कपाळावर पारंपरिक टिळा लावला आणि गळ्यात लाल रंगाचा स्कार्फ (दुपट्टा) घालून त्याचे औक्षण केले. या अनोख्या आदरातिथ्याने तेथे जमलेले नागरिक भारावून गेले. (Robot VVIP entry)
रोबोटचा जबरदस्त डान्स अन् सँडविचची पाहणी
नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ...
या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे या रोबोटचा डान्स! स्वागताचा स्वीकार केल्यानंतर रोबोटने उपस्थितांसोबत संगीताच्या तालावर भन्नाट डान्स केला. त्याचा हा स्टेप-बाय-स्टेप डान्स पाहून तेथे उपस्थित असणारे सर्वच लोक थक्क झाले. या औपचारिकतेनंतर रोबोटने दुकानाच्या आत प्रवेश केला. जरी रोबोट सँडविच खाऊ शकत नसला, तरी दुकान मालकाने त्याला बनवलेले सँडविच दाखवले आणि रोबोटनेही एखाद्या मुख्य अतिथीप्रमाणे त्याची बारकाईने पाहणी केली.
सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल; नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
या संपूर्ण सोहळ्याचा व्हिडिओ @NilayPhotos या 'एक्स' (ट्विटर) अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून, काही वेळातच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका युजरने कमेंट करत विचारले, "व्यावसायिक कार्यक्रमासाठी हा रोबोट कसा बुक करायचा, कोणाला माहिती आहे का?" दुसऱ्या एका युजरने चिंता व्यक्त करत लिहिले, "लवकरच वेटर आणि आचाऱ्यांची जागा रोबोट्स घेतील, माणसे स्वतःलाच बेरोजगार करतील." तर एका नेटकऱ्याने रोबोटचे समर्थन करत म्हटले, "भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांना उद्घाटनाला बोलावण्यापेक्षा रोबोटला बोलावणे कधीही उत्तम!" तंत्रज्ञानाचा हा कल्पक वापर आणि पब्लिसिटी स्टंट सध्या डिजिटल जगात प्रचंड पसंत केला जात आहे.