‘आर्या ओम्नीटॉक’ विश्वासार्ह जीपीएस सोल्युशन पुरविणारी कंपनी

  75

मुंबई : टेलीमॅटिक्स उद्योगात वीस पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या आर्या ओम्नीटॉकने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक क्षेत्रात आयओटी आणि जीपीएसचा वापर वाढला असून त्यामध्ये या क्षेत्राला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. साहजिकच ‘आर्या ओम्नीटॉक’सारखी विश्वासार्ह जीपीएस सोल्युशन पुरविणारी कंपनी एकमेव ठरत आहे.



लॉजिस्टिक्स, घातक रसायनांची व नाशवंत अन्नपदार्थांची वाहतूक, कर्मचारी वाहतूक, कोणत्याही मालाचे कार्यक्षम वितरण अशा प्रत्येक क्षेत्रात ‘आर्या ओम्नीटॉक’च्या जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस आणि ‘फ्लीट विझिल’ या एसएएएस-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे पारंपरिक ट्रॅकिंगच्या पलीकडे जाऊन काम केले जाते. कंपनीची ही सोल्युशन्स फ्लीट ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी, सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक परतावा देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत.



आर्या ओम्नीटॉक’चे सीओओ व सीटीओ सौमिल ध्रू यांनी सांगितले की “प्रत्येक ग्राहकाच्या विशिष्ट गरजांनुसार त्याला खास प्रकारची सोल्युशन्स देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. उद्योगातील सर्व क्षेत्रांसाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि ऑप्टिमाइज्ड वाहतूक व्यवस्था साकार करण्याकरीता आम्ही आमचा काळानुरुप सिद्ध झालेला, अतिशय विश्वासार्ह आयओटी प्लॅटफॉर्म उपयोगात आणत असतो."



वाहनांमध्ये एआयएस १४० जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसविल्यामुळे भारतातील वाहतूक आणि रस्ते सुरक्षेच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येत आहे. या उपकरणांबाबत खुद्द केंद्र सरकारनेच आदेश दिलेला असल्याने व्यावसायिक वाहनांच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून येत असून सुरक्षेच्या उच्च मानकांची अंमलबजावणी करण्यात आणि एकंदर वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यात हा आदेश क्रांतिकारक ठरणार आहे.
Comments
Add Comment

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रुपयांत उपलब्ध

मुंबई : किया इंडिया कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९

RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २,६८,५९०.०७ कोटी रुपयांचा विक्रमी

टाटा मोटर्सची ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लाँच

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजच्‍या लाँचची घोषणा

तोट्यातून नफ्यात आली अनिल अंबांनींची कंपनी

मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात

शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्ह दिसताच भारतीय शेअर बाजार वधारला.

चीनला फटका, भारतीय निर्यातीचा झटका

महेश देशपांडे जगातील दोन सर्वात दोन मोठे देश असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने