शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्ह दिसताच भारतीय शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदारांमध्ये शेअर खरेदीचा उत्साह दिसू लागला. बीएसई सेन्सेक्स २३५० .४२ गुणांनी वधारला आणि ८१,८०४.८९ गुणांवर जाऊन पोहोचला. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे बीएसई सेन्सेक्स २.९६ टक्क्यांनी वधारला. तणाव निवळण्याचे सकारात्मक परिणाम एनएसईच्या निफ्टीतही दिसून आले. निफ्टी फिफ्टी ७२८.२५ गुणांनी वधारला आणि २४,७३६.२५ गुणांवर जाऊन पोहोचला. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे निफ्टी फिफ्टी ३.०३ टक्क्यांनी वधारला.


याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. आता सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. चर्चा यशस्वी झाली तर शस्त्रसंधी कायम राहील. पण चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. पण रविवारच्या रात्रीपासून सोमवारी अद्यापपर्यंत सीमेवर गोळीबाराचे वृत्त नाही. यामुळे तणाव निवळणार अशी चर्चा गुंतवणूकदारांमध्ये सुरू आहे. याचाच सकारात्मक परिणाम शेअर बाजारत दिसला.


शेअर बाजार वधारण्याची प्रमुख कारणे




  1. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा तणाव निवळण्याची शक्यता

  2. भारत आणि इंग्लंड यांच्यात मुक्त व्यापार करार

  3. परकीय गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक

  4. एप्रिल २०२५ मध्ये म्युच्युअल फंडांद्वारे भारतीय शेअर बाजारात २६ हजार ६३२ कोटी रुपयांची गुंतवणूक

  5. अमेरिकेमुळे सुरू झालेले टॅरिफ वॉर शांत होण्याची शक्यता, अमेरिका आणि चीन यांच्यात होणार चर्चा

  6. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान झालेली युद्धबंदी, युरोपशी आणि युरोपद्वारे होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत होण्याची शक्यता

Comments
Add Comment

Shivendrasinhraje Bhosale : 'इन्फ्रा' प्रकल्पांच्या कंत्राटदारांना कामाच्या गुणवत्तेनुसार मिळणार 'रेटिंग'

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय; ५०० कोटींहून मोठ्या प्रकल्पांसाठी नवी कार्यपद्धती मुंबई :

Nashik News : खरीप पेरणीत नाशिक आघाडीवर, नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण

Nashik News : दडी मारलेल्या पावसाने अखेर चिंताग्रस्त शेतकऱ्यांना जुलै महिन्यात मोठा दिलासा दिला. पावसाअभावी खरिपाच्या

Pune Crime : मिसळ खाताना क्षुल्लक कारणावरून वाद; लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे :आपण हॉटेलमध्ये खाण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी जातो. मात्र, कधी-कधी छोट्या-मोठ्या कारणांवरून तिथे वाद

CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक

Kurla landslide incident : कुर्ला आणि राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमी व मृतांची माहिती समोर; ७ जणांचा मृत्यू, ७ जखमी

मुंबई : कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमी आणि मृतांची प्राथमिक

Nashik Simhastha Kumbh Mela : पहिल्यांदाच साधुग्रामला स्वतंत्र पोलीस उपायुक्त, कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा निर्णय

Nashik Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरु आहेत. कुंभमेळा हा लाखो कोट्यवधी