GBS Patient : जीबीएसचे सोलापुरात ५ संशयित रुग्ण; औषधे व यंत्रांसाठी २ कोटींचा निधी

  67

सोलापूर : जीबीएस (गुलियन बॅरे सिंड्रोम)चे जिल्ह्यात संशयित पाच रूग्ण असून त्यातील एक रूग्ण बरा झाला आहे. सध्या उपचार घेत असलेले चारही जीबीएस संशयित रूग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत. औषधे व यंत्रांसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून आवश्‍यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.



जीबीएस आजाराबाबत लोकांत गैरसमज व संभ्रम आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. तो होऊ नये, यासाठी नागरिकांनी स्वच्छ, शुद्ध पाणी व पूर्णपणे शिजवलेल्या आहाराचे सेवन करावे. रुग्णांवरील उपचारासाठी जिल्‍ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून दोन कोटींचा निधी दिला आहे. पुरेसा निधी उपलब्ध असून आवश्‍यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करण्यात येईल. सर्वजण मिळून याविरोधात लढूया, जिंकूया, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले उपस्थित होते.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची