मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणावतचा इमर्जन्सी हा चित्रपट १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने १७ जानेवारी ते २६ जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १६ कोटी ७० लाख रुपयांची कमाई केली. अवघ्या दहा दिवसांत जवळपास १७ कोटी रुपये कमावणाऱ्या या चित्रपटाची २० कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.
कायदेशीर पेच आणि तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेला इमर्जन्सी हा चित्रपट अखेर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला. कंगनाच्या चित्रपटाची बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या आझाद या चित्रपटाशी स्पर्धा झाली. या स्पर्धेत टिकाव धरुन चित्रपटाने दहा दिवसांत जवळपास १७ कोटी रुपये कमावले. प्रजासत्ताक दिनी कंगनाच्या चित्रपटाने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल
बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टनुसार कंगना राणावतच्या इमर्जन्सी या चित्रपटाने १७ जानेवारी रोजी अडीच कोटी, १८ जानेवारी रोजी ३.६ कोटी, १९ जानेवारी रोजी सव्वा चार कोटी, २० जानेवारी रोजी १.०५ कोटी, २१ जानेवारी रोजी १ कोटी, २२ जानेवारी रोजी एक कोटी, २३ जानेवारी रोजी ०.९ लाख, २४ जानेवारी रोजी ०.४ लाख, २५ जानेवारी रोजी ८५ लाख, प्रजासत्ताक दिनी म्हणजेच रविवार २६ जानेवारी रोजी १.१५ कोटी (अर्ली रिपोर्ट) एवढी कमाई केली. चित्रपटाच्या उत्पन्नात वारंवार चउतार होत असले तरी हा चित्रपट अजूनही लोकांच्या आकर्षणाचा विषय होत आहे.
Ilu Ilu : प्रेमाची हलकी झुळूक घेऊन येतंय ‘इलू इलू’; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!
इमर्जन्सी या चित्रपटाने इतर मसालापटांच्या तुलनेत कमाई कमी केली असली तर हा चित्रपट अपवाद वगळता सातत्याने एक कोटीच्या घरात कमाई करत आहे. यामुळे लवकरच चित्रपट २० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.