Monday, February 10, 2025
Homeदेशजगातील सर्वात उंच रेल्वे रुळावरुन धावली वंदे भारत एक्सप्रेस

जगातील सर्वात उंच रेल्वे रुळावरुन धावली वंदे भारत एक्सप्रेस

कटरा : जम्मू काश्मीर फिरू इच्छिणाऱ्या तसेच वैष्णो देवीच्या दर्शनाला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता दिल्ली – श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसद्वारे वेगाने, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. भारतीय रेल्वेने शनिवार २५ जानेवारी २०२५ रोजी कटरा ते श्रीनगर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी घेतली. चाचणी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस जगातील सर्वात उंच अशा चिनाब रेल्वे पुलावरुन आणि देशातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पूल अंजी खडवरुन धावली. वंदे भारत एक्सप्रेसची शनिवारची चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता दिल्ली ते श्रीनगर हा प्रवास लवकरच जगातील सर्वात उंच अशा चिनाब रेल्वे पुलावरुन तसेच देशातील पहिल्या केबल-स्टेड अंजी खड रेल्वे पुलावरुन होऊ शकेल.

चिनाब रेल्वे पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी दरम्यान आहे. हा पूल चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे तसेच हा जगातील सर्वात उंच कमानी पूल आहे. जम्मू काश्मीरमधील थंड वातावरणाचा विचार करुन वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे गाडी थंडीच्या दिवसांतही आरामात प्रवास करू शकेल.

कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक

वंदे भारत गाडीची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर परदेशातही वाढू लागली आहे. अनेक देशांनी भारतातून सेमी-हायस्पीड वंदे भारत आयात करता येतील का ? याबाबत चौकशी सुरू केली आहे.

Crime News : पुण्याच्या डॉक्टर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा डॉक्टर नवी मुंबईत सापडला

भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर धावली. ही गाडी ताशी १६० किमी वेगाने धावली. यानंतर वंदे भारत गाड्या देशात वेगवेगळ्या मार्गांवर धावू लागल्या आहेत. वंदे भारतच्या काचेवर कधीही बर्फ जमा होत नाही. ही गाडी उणे ३० अंश से. तापमानातही धावू शकते. या गाडीची काही वैशिष्ट्ये विमान प्रवासाशी मिळतीजुळती आहेत. यामुळे वंदे भारत गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -