Sai temple security : साई मंदिराच्या सुरक्षा पथकात नव्या श्वानाची एन्ट्री

शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षा पथकात (Sai temple security) आता 'सिंबा' नावाच्या नव्या श्वानाची एन्ट्री झाली आहे. 'वर्धन' श्वानाने दहा वर्ष सेवा दिल्यानंतर तीन महिन्याचा 'सिंबा' आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात दाखल झाला आहे. सिंबाची बीडीडीएस पथकाकडून ट्रेनिंग सुरू असून लवकरच तो साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे.


शिर्डी साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज लाखो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. याचबरोबर व्हीव्हीआयपी देखील मोठ्या प्रमाणात इथे येत असतात.साई मंदिर आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने साईबाबा मंदिरासाठी स्पेशल बीडीडीएस पथक तैनात करण्यात आले आहे.



साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या पहाटेच्या काकड आरती,मध्यान्ह आरती आणि धुपाआरती तसंच रात्रीच्या शेजारतीच्या अगोदर साईंच्या समाधी मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरात बीडीडीएस पथकाकडून तपासणी केली जाते. बीडीडीएस पथकात पूर्वी 'वर्धन' नावाचा श्वान कार्यरत होता. मात्र,तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी आता सिंबा दाखल झाला आहे. सिंबाचे सध्या साई मंदिर परिसरात प्राथमिक प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच तो पुणे सीआयडी येथून ट्रेन होऊन साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे.


गेल्या दहा वर्षांपासून साई मंदिरात वर्धन श्वानाने सेवा दिल्यानंतर आज तो सेवानिवृत्त झाल्याने बीडीडीएस पथकातील अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पथकाच्या वतीनं वर्धनचा साईबाबांची शाल, फुलांचा हार देऊन सन्मान करण्यात आला. तर सिंबाला साई मंदिर परिसरात आणण्यात आले. यावेळी साईबाबांची 'ओम साई राम' नावाची शाल देऊन सिंबाचा सत्कार करण्यात आला.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

अमरावती : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतले आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात एका माथेफिरू मुलाने केवळ मालमत्तेच्या वादातून आपल्या वृद्ध