Amit Shah : अमित शाह, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौ-यावर

  73

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतकरी घालणार साकडे


नाशिक : मालेगाव तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) आज, शुक्रवारी (दि. २४) नाशिक दौ-यावर येत आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार असून त्यांची सहकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ यात्रेच्या कालावधीत शाहांचा हा दौरा होणार असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी विमानतळावर आगमन होणार असून बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करणार आहेत. त्त्यानंतर १२ वाजून २० मिनिटांनी त्र्यंबक येथील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरेल, तेथून ते मोटारीने त्र्यंबकेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतील. साडेबाराच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात आगमन होणार असून त्याठिकाणी ते त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजन करणार आहेत. मंदिरातील पूजेसाठी वीस मिनिटांचा कालावधी आरक्षित केलेला आहे. त्यानंतर दुपारी एकला ते हेलिकॉप्टरने मालेगावकडे रवाना होतील.


दुपारी दोनला गृहमंत्री शाह हे मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील वेंकटेश्वरा को. ऑपरेटिव्ह फर्मला भेट देणार आहेत. याठिकाणी सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीनला बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते ओझर विमानतळावरून वीएसएफच्या विमानाने मुंबईकडे परततील.



अमित शाह यांच्या या जिल्हा दौ-याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थिती ढासळलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी याकरिता पुढाकार घ्यावा, यासाठी जिल्ह्यातील शेतकरी मंत्री शाह यांना साकडे घालणार आहेत. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या ६१० दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.


मालेगाव तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आज, शुक्रवारी नाशिक दौ-यावर येत आहेत. जिल्ह्यातील या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे यांनी दिली.


थकबाकीदार शेतक-यांकडे २२०० कोटी व्याज व मुद्दलासह थकीत असून, ३६० कोटींचे बिनशेती कर्ज थकले आहे. या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार नरेंद्र जगताप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. थकीत कर्जवसुलीवरील स्थगिती उठवावी, विधानसभा निवडणूक काळात दिलेले शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळून त्यांचा सातबारा खातेउतारा कोरा करावा, अशी मागणी त्याद्वारे करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत