अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास

प्रयागराज : महाकुंभमेळ्यातून एक मोठी बातमी आली आहे. बॉलिवूडमध्ये ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने धार्मिक विधी करुन संन्यास घेतला. आता ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर श्री यमाई ममता नंदगिरी झाली आहे. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी ही माहिती दिली.



स्वतःचे पिंडदान केल्यानंतर ममता कुलकर्णीने संन्यास घेतला. ममताचा पट्टाभिषेक झाला. यानंतर ममताला धार्मिक विधी करुन महामंडलेश्वर केल्याचे जाहीर करण्यात आले. ममताला किन्नर आखड्याची सदस्य म्हणून नवे नाव देण्यात आले आहे. हेच नाव आता ममताची ओळख असेल. ती साध्वी प्रमाणे जीवन जगणार आहे.



अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर ममता मागील २४ - २५ वर्षांपासून परदेशात वास्तव्यास होती. ममतावर अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी असल्याचा आरोप झाला. पण हा आरोप सिद्ध झाला नाही. आता प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतलेली ममता संन्यास घेऊन एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.

मागील वर्ष - दीड वर्षापासून ममता कुलकर्णी किन्नर आखाडा आणि महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांच्या संपर्कात होती. प्रदीर्घ चर्चेअंती ममताने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment

पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाहंचा झंझावात दिसणार

पाटणा : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमेलगतची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवणार

राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली  :केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

नवी दिल्ली : प्रवासाची उत्तम सोय आणि आराम देणारा, फास्टटॅगचा वार्षिक पास या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी एक

Bihar elections: पंतप्रधान घेणार १० जाहीर सभा तर अमित शहा २५ सभा घेणार

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या १० जाहीर सभा प्रस्तावित आहेत.

'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून

आगळीक कराल तर याद राखा; पाकिस्तानची इंच न् इंच जमीन 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा लखनऊमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तयार;