Bollywood Death Threats : बॉलिवूडवर संकटाचे सावट! चार दिग्गज कलाकारांना दिली जीवे मारण्याची धमकी

मुंबई : काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर नुकतेच सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अशातच आता बॉलीवूडमधले चार दिग्गज कलाकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर संकट आल्याचे दिसून येत आहे.



कॉमेडियन कपिल शर्माला (Kapil Sharma), अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav), कोरिओग्राफर रेमो डिसुझा (Remo Dsouza) आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कपिलसह त्याच्या कुटुंबालाही मारण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



धमकीचा पाकिस्तानशी कनेक्शन


कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुंगधा मिश्रा या कलाकारांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला असल्याचा अंदाज दिला जात आहे. यामध्ये 'BISHNU' असे लिहिण्यात आले आहे. तसेच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला जर ८ तासात प्रतिसाद मिळाला नाही तर, कारवाई करणार असे लिहले आहे. (Bollywood Death Threats)

Comments
Add Comment

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.