महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही कंटेंट क्रिएटर्सने विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी येथे जेन ओ : पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल इस्पोर्ट गेम्स या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, जेन ओचे संस्थापक श्रीपाद अष्टेकर आणि ग्लोबल ई-स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष पॉल फॉस्टर उपस्थित होते.


गेमिंग क्षेत्रातील करिअरविषयी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझ्या मुलींने गेमिंगमध्ये करिअर करायचे ठरवले, तर त्यांना १०० टक्के परवानगी आणि पूर्ण पाठिंबा असेल. कोणतेही क्षेत्र निवडले तरी मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री कार्यालयाचे २४x७ लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले केले की, मुख्यमंत्री ऑफिसद्वारे मोठे प्रकल्प आणि महत्त्वाचे निर्णय लोकांसमोर लाईव्ह प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले.


कंटेंट क्रिएटर्सना भेडसावणाऱ्या ‘व्ह्यूज टू व्हॅल्यू’ या समस्येबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासन क्रिएटर्स आणि ब्रँड्स यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अलीकडेच यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांच्यासोबत चर्चा झाली असून, क्रिएटर्ससाठी मजबूत इकोसिस्टम तयार करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच एव्हीजीसी (AVGC) धोरणाद्वारे क्रिएटर इकॉनॉमीला चालना दिली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


विद्यार्थ्यांसाठी कंटेंट क्रिएटिव्ह क्षेत्रात औपचारिक शिक्षणाच्या संधी वाढवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) स्थापन करण्यात आले असून, हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेमिंग, अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये करिअरची स्पष्ट दिशा मिळणार आहे.ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधांबाबत त्यांनी सांगितले की, राज्यातील ४० हजार गावांपैकी सुमारे ७० टक्के गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत प्रत्येक गावात उच्चगती इंटरनेट उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे गेमर्सना ‘लॅग-फ्री’ अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


आंतरराष्ट्रीय दर्जाचे गेम्स तयार करण्याबाबतही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १२ एव्हीजीसी हब्स विकसित केले जात असून, त्याद्वारे जागतिक दर्जाचे गेम्स तयार करण्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभी केली जाणार आहे. याशिवाय, नवी मुंबई विमानतळाजवळ ५० एकर जागेवर कंटेंट क्रिएटर्ससाठी अत्याधुनिक कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना असल्याचेही त्यांनी जाहीर केले. येथे ई-स्पोर्ट्स, कंटेंट क्रिएशन आणि संबंधित सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

Comments
Add Comment

Palghar Crime : पहाटे घराबाहेर पडली, प्रियकराच्या घरी गेली अन्...१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

पालघर : पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू तालुक्यात (Dahanu News) एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली असून, १७ वर्षीय

Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत