मुंबई : महाराष्ट्र शासनाने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरू असूनही किराणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिंक हे एखाद्या ड्रग एवढेच घातक आहे. त्यामुळे शाळा कॉलेजच्या आसपास कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे.
जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. तरुण वर्गासोबतच लहान मुले देखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. एनर्जी ड्रिंक्स १८ वर्षाखालील मुलांनी सेवन करू नये असे लिहिण्यात आलेले असते. मात्र विक्रेते याकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट या वयातील मुलांनाही एनर्जी ड्रिंक्सची विक्री करतात.
एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिणाम
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…