Lodha Brother's : लोढा भावांमध्ये व्यावसायिक फूट!

मुंबई : व्यावसायिक विश्वातील नामांकित नाव असलेले मंगलप्रभात लोढा यांच्या दोन्ही मुलांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दोन्ही मुलांमध्ये पडलेली व्यावसायिक फूट वाढली आहे. व्यापार चिन्हाच्या स्वामित्व हक्कावरुन दोघा भावांमध्ये संघर्ष सुरु आहे.



मंगलप्रभात लोढा हे बांधकाम व्यवसायातील गाजलेलं नाव आहे. मंगलप्रभात लोढा यांचे अनेक बांधकामांचे प्रकल्प प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांचे दोन्ही मुलं व्यवसाय करत आहेत. दोघांचीही स्वतंत्र कंपनी असून मोठे पुत्र अभिषेक याची मॅक्रोटेक डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे तर अभिनंदन लोढा याची 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' नावाची कंपनी आहे. मात्र आता लोढांचे मोठे चिरंजीव अभिषेकने धाकट्या भावाच्या 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या कंपनीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. लोढा समुहाचा लोगो वापरण्यापासून रोखण्यासाठी अभिषेकने याचिका दाखल केली आहे. तसेच लोढा ग्रुपचा लोगो वापरण्यास अभिनंदन लोढा यांना मनाई करावी, अशी मागणी याचिकेतून कोर्टाकडे करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर ५ हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान आता हा वाद वाढणार की शांततेत सुटणार याकडे पहाणे महत्त्वाचे ठरेल

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल