गुंतवणूक करार ६,२५,४५७ कोटींवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या विविध कंपन्यांच्या भेटी

टाटा समूह ३०,००० कोटी गुंतवणूक करणार


दावोस : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६ लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.


काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.



रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. याबरोबरच रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांचीही त्यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५,००० मेवॉ पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.


शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच शर्मा यांनी केले.


मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.


कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

Comments
Add Comment

FDA Raid : 'सिप्ला'च्या पुणे गोदामाचा औषध विक्री परवाना रद्द

- अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; 'रिअॅक्टिन प्लस' औषधांचा साठाही जप्त मुंबई : प्रिस्क्रिप्शन औषध असलेल्या

Ashish Shelar : ॲड. आशिष शेलार यांची ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : "ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन" (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

Pune-Mumbai Highway : काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात; ओढ्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

पिंपरी-चिंचवड :  वाकडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान