Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत बदल घडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना केवळ आजच्या नोकऱ्यांसाठीच नाही, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीसाठी तयार करावे. शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण अत्यंत महत्त्वाचे असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा (Governor Jishnu Dev Verma) यांनी केले. डिजीआयआय १०० एक्स महाराष्ट्र,पुणे संवादच्या व सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) सहकार्याने हॉटेल हयात येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Governor Jishnu Dev Verma)


या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सिम्बायोसिस सोसायटीच्या प्रधान संचालिका आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, उच्च शिक्षण विभागाचे अप्पर सचिव, आनंदराव पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक रत्नाकर पै, QS इंडिया अध्यक्ष आणि धोरणात्मक व आंतरराष्ट्रीय सहभागचे उपाध्यक्ष डॉ. अश्विन फर्नांडिस, डिजीआयआय चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिका हेमंत सहल आदी उपस्थित होते. (Governor Jishnu Dev Verma)



राज्यपाल वर्मा (Governor Jishnu Dev Verma) म्हणाले, विद्यापीठांनी कौशल्य-आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी या इनक्युबेशन केंद्रांचा लाभ घ्यावा. असे प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचे केंद्र बनावे, जिथे विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर देणारे पदवीधर होतील. रोजगार क्षमतेवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक पदवीधराने पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यापूर्वी अर्थपूर्ण कामाचा अनुभव घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपले पदवीधर रोजगारक्षम होत नाहीत, तोपर्यंत भारताकडे असलेल्या युवा लोकसंख्येचा आपण पूर्ण फायदा उठवू शकत नाही.


महाराष्ट्राला प्रगल्भ सांस्कृतिक आणि नागरी वारसा लाभला असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, राज्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. वारसा जतन, सांस्कृतिक संवर्धन, पायाभूत सुविधा आणि डिजिटल पोहोच यांचे प्रभावी एकत्रीकरण केले, तर पर्यटन हे रोजगार आणि आर्थिक विकासाचे एक प्रमुख इंजिन बनू शकते. त्यासाठी विद्यापीठे संशोधन, दस्तऐवजीकरण, वारसा व्यवस्थापन, पर्यटन अभ्यास आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून यामध्ये योगदान देऊ शकतात. (Governor Jishnu Dev Verma)



आपल्या पारंपारिक कला, हस्तकला, लोकपरंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती, कृषी विविधता यांचे जतन करणे आणि कृषी-पर्यटनाला (अॅग्रो-टूरिझम) चालना देण्यातून हजारो शाश्वत उपजीविका निर्माण होऊ शकतात. लोकभवनने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक पारंपारिक कलाप्रकार शोधून त्यांचे जतन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा समृद्ध सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवणे ही भावी पिढ्यांसाठी ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. विनायक पै यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध नामवंत शिक्षण संस्थातील तज्ज्ञ उपस्थित होते. (Governor Jishnu Dev Verma)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि