Central Railway : मध्य रेल्वे कडून मुंबई आणि अहमदाबादसाठी ४ विशेष वातानुकूलित गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान ४ विशेष वातानुकूलित ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांचा फायदा प्रसिद्ध संगीत गट "कोल्ड प्ले" च्या संगीत कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांनाही होईल.



गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


*लोकमान्य टिळक टर्मिनस - अहमदाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष (२ सेवा)*


०११५५ वातानुकूलित विशेष दि. २५.०१.२०२५ रोजी ००.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि अहमदाबाद येथे त्याच दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा)


०११५६ वातानुकूलित विशेष २६.०१.२०२५ रोजी ०२.०० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (१ सेवा)


थांबे: ठाणे, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, वापी, उधना, सुरत आणि वडोदरा


संरचना: दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १४ तृतीय वातानुकूलित आणि १ जनरेटर कार.


*दादर- अहमदाबाद- दादर वातानुकूलित विशेष (२ सेवा)*


०११५७ वातानुकूलित विशेष दि. २६.०१.२०२५ रोजी ००.३५ वाजता दादर येथून सुटेल आणि अहमदाबाद येथे त्याच दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा)


०११५८ वातानुकूलित विशेष दि. २७.०१.२०२५ रोजी ०२.०० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी १२.५५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)


थांबे : ठाणे, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, वापी, उधना, सुरत आणि वडोदरा.


संरचना: दोन प्रथम वातानुकूलित, दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित आणि २ द्वितीय सिटिंग सह गार्ड्स ब्रेक व्हॅन.


आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०११५५ आणि ०११५७ वातानुकूलित विशेषसाठी बुकिंग दि. २३.०१.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. विशेष गाड्यांच्या थांब्यावरील तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग