Friday, February 14, 2025
Homeताज्या घडामोडीमुक्तागिरी बंगल्याबाहेर चेंगराचेंगरी; मंत्री भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

मुक्तागिरी बंगल्याबाहेर चेंगराचेंगरी; मंत्री भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर शिवसेना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मंगळवारी धक्काबुक्की करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत रस्ता बंद केला. पोलिसांनाही न जुमानता गोंधळ सुरू असल्याने सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी बंगल्याबाहेर निघून गेले. रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून गोगावले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बंगल्यावर येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल

रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. दरम्यान, भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शेकडोंच्या संख्येने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मलबार हिल येथे मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. याच ठिकाणी पालकमंत्री पद मिळणे हा आमचा हक्क आहे. चार टर्म भरतशेट गोगावले निवडून आलेले आहेत. आता पालकमंत्री पद मिळालेच पाहिजे. रायगड जिल्ह्यात तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, अन्यथा रायगड बंद करू, असा इशारा यावेळी गोगावले यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.

आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध करत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. भरतशेठ गोगावले यांची जोपर्यंत पालकमंत्री म्हणून घोषणा होत नाही, तोपर्यंत संघटनेचे काम करणार नाही, असा पवित्राच भरतशेठ गोगावले समर्थकांनी घेतला आहे. आम्ही हे सहन करणार नाही. सह-पालकमंत्रिपद आम्हाला चालणार नाही, असे शिवसेना शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -