Good news for BSNL users : 'बीएसएनएल' वापरकर्त्यांना सगळीकडे मिळणार रेंज!

मुंबई : मोबाईल वापरकर्त्यांचा कनेक्टिव्हिटी अनुभव सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने एक नवीन फिचर सुरू केले आहे. ज्यामुळे जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल वापरकर्तांना नेटवर्कशिवाय कॉल करणे शक्य होणार आहे. देशातील सर्व टेलिकॉम टॉवर्समध्ये सुरू करण्यात आलेल्या इंट्रा सर्कल रोमिंग सेवेच्या मदतीने हे शक्य होईल. तसेच ही सेवा सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.




वापरकर्ते फक्त त्यांच्या विशिष्ट टेलिकॉम ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या टॉवर्सच्या मदतीने ही सेवा मिळवू शकत होते, पण आता ICR सुविधेसह, जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहक अखंड कनेक्टिव्हिटीसाठी DBN-निधीत टॉवर्स वापरू शकतात.



खर्चात होणार बचत


दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार, ही योजना भारतातील ३५,४०० हून अधिक गावांमध्ये २७,००० DBN-निधीत टॉवर्सद्वारे 4G कव्हरेज देईल. तसेच ही सेवा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केली आहे. यासोबतच, संचार साथी मोबाईल अ‍ॅप आणि राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन २.० देखील लाँच करण्यात आले आहे. या सुविधेमुळे, दूरसंचार कंपन्यांना प्रत्येक भागात त्यांचे टॉवर बसवण्याची आवश्यकता राहणार नाही. या उपक्रमामुळे टीएसपींना ऑपरेशनल खर्चात बचत होणार असून त्यांच्या ग्राहकांना सिग्नलच्या कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.



ग्रामीण कनेक्टिव्हीटी सुधारणा


ICR सुविधेबाबत बोलताना सिंधिया यांनी वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, बीएसएनएल, एअरटेल आणि जिओ या तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांमधील हे सहकार्य डीबीएन-निधी असलेल्या साइट्सचा फायदा घेत आहे. दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत स्थापन झालेला DBN हा भारत सरकारने कमी सेवा असलेल्या क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तयार केलेला निधी आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग