सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द - पालकमंत्री नितेश राणे

  96

कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य


सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे आवश्यक आहे. ‍जनतेची कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने सामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. भ्रष्टाचार आणि बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी जनतेचा सेवक म्हणून जबाबदारी पार पाडावी. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे. जिल्ह्याची नाहक बदनामी होईल असे काम कोणीही करु नये. जिल्ह्याच्या प्रतिमेला गालबोट लागता कामा नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. आपला जिल्हा दरडाई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी विकासात्मक कामांना नेहमीच प्राधान्य देणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


पालकमंत्री श्री राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर वरिष्ठांनी जबाबदारी दिलेली असून मी ती समर्थपणे पार पाडणार. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य राहणार. अवैध धंदे चालू देणार नाही. मटका, जुगार तसेच ऑनलाईन गेमिंग अशा धंद्यावर कारवाई करणार. आपला जिल्हा ड्रग्जमुक्त करणार. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात शिस्त लावण्याचा माझा प्रयत्न राहिल. कामाच्या बाबतीत बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार. जिल्ह्यात अनेक नवनवीन प्रकल्प आणण्याबरोबरच विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपला नेहमी प्रयत्न असणार. आपल्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दुर्गम भागासाठी मिनी बस आणण्यासाठी प्रयत्न करणार असेही ते म्हणाले.


पालकमंत्री श्री राणे पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवत असते. या योजनांचा लाभ तळागाळातल्या पात्र नागरिकांना मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनीधी यांच्यात समन्वय साधणार. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेशी संवाद साधणार. सर्वसामांन्याच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने आणि राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा अनेक महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास प्राधान्य देणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना