चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन

डोंबिवली : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू अॅक्युपंक्चर थेरपिस्ट आणि गिटार वादक किरण फाळके यांचे शनिवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे.





किरण फाळके मागील सहा दशकांपासून डोंबिवलीत वास्तव्यास होते. ते डोंबिवलीतील अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार होते. अनेकजण किरण फाळकेंना स्वच्छंदी आणि हसतमुख स्वभावाची व्यक्ती म्हणून ओळखत होते. त्यांनी अॅक्युपंक्चर थेरपिस्ट म्हणून ३५ वर्षे काम केले. अनेक गरजूंवर विनामूल्य उपचार केले. नुकतीच त्यांची भिवंडी येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली होती. या क्षेत्रात अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते.



गिटार वाजवणे हा त्यांचा छंद होता. की बोर्ड, साऊथ अर्बन, गिटार, हवाईयन गिटार अशी पाच - सहा वाद्ये वाजवण्यात ते निपुण होते. त्यांनी डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दोन सीडी तयार केल्या होत्या. तसेच बाईकवरुन डोंबिवली ते कन्याकुमारी आणि डोंबिवली ते पाकिस्तानची सीमा असे भारत भ्रमण केले होते. किरण फाळके यांच्या निधनाने डोंबिवलीतील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या