Coldplay Concert : कोल्डप्लेला जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! मुंबईहून अहमदाबादसाठी सुटणार विशेष रेल्वे

  107

मुंबई : गुजरातमध्ये होणाऱ्या कोल्डप्लेची (Coldplay Concert) घोषणा होताच देशभरातील अनेक संगीतप्रेमींचा उत्साह गगनाला भिडत चालला होता. अशातच गुजरात कोल्डप्ले कॉन्सरच्ला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता पश्चिम रेल्वेने (Western Railway) आनंदाची बातमी दिली आहे. पश्चिम रेल्वे गुजरात कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी मुंबईहून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन (Special Train) सोडणार आहे. त्यामुळे गुजरात येथील कोल्डप्ले कॉन्सर्टला जाणाऱ्यांसाठी याचा चांगलाच फायदा होणार आहे.



कसे असेल वेळापत्रक?



  • मुंबई ते अहमदाबाद विशेष रेल्वे गाड्या २५ आणि २६ जानेवारी रोजी चालवण्यात येणार आहेत. पहिली ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून दुपारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथे पोहचेल. तर परतीची ट्रेन रेल्वे मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.

  • तर दुसरी ट्रेन २७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ५० मिनिटांनी अहमदाबाद येथून सुटणार आहे आणि सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल. या ट्रेन बोरीवली, वापी, उधना, सूरत, भरूच, वडोदरा आणि गरतापुर या स्थानकांवर थांबेल.


दरम्यान, कोल्डप्ले कॉन्सर्टवेळी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने विशेष लोकल सोडण्याचे नियजन केले आहे. या दोन्ही विशेष रेल्वेची तिकिटे बुक माय शो द्वारे बुक करता येणार आहे.



नवी मुंबईतील कोल्डप्लेसाठी विशेष रेल्वे


रेल्वे प्रशासनाने नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियम येथे होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी देखील विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. नवी मुंबईत १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी होणारे या कॉन्सर्टसाठी गोरेगाव ते नेरुळ स्थानकादरम्यान धावणार आहेत. या लोकल फक्त कोल्डप्ले सभासदांसाठीच असणार आहेत.

Comments
Add Comment

काम करा, अन्यथा फेरबदल होणार : शिंदेंचा मंत्र्यांना इशारा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या

वाळत घातलेले कपडे काढताना लागला विजेचा धक्का, महिलेचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो, महिला आयोगाचा धक्कादायक खुलासा

पुणे : पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे

अवयवदानात महाराष्ट्र देशात अव्वल!

मुंबई : अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या वर्षी राज्यात १९८ ब्रेन-डेड दात्यांची नोंदणी

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार जुलैचा हप्ता

मुंबई : राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून १५०० रुपये बँक खात्यात

पुण्यात बोर्ड काढण्यावरून वाद , तरुणावर कोयत्याने वार; काँग्रेसच्या माजी नेत्यावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . कधी खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार , तर कधी कोयता गँग