Pune Accident : ३ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक; ९ जण जागीच ठार!

पुणे : पुण्यात अपघातांची मालिका (Pune Accident) सुरुच असल्याचे दिसून येत आहे. काल पुणे शहरात कंटेनरने वाहनांना धडक दिल्याची घटना घडली  होती. त्यानंतर आज पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला असून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायणगाव परिसरात मुक्ताई ढाब्यानजीक आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी नाशिकहून पुण्याच्या मार्गाने जाणाऱ्या एसटी बसचा नारायणगावजवळ ब्रेक फेल झाला. त्यामुळे ती एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी एक मॅक्झिमो गाडी येत होती. त्याच्या पाठीमागून एक आयशर ट्रक भरधाव वेगाने येत होता. भरधाव आयशरने प्रवासी असलेल्या मॅक्झिमो गाडीला भीषण धडक दिली. त्यानंतर मॅक्झिमो गाडी बंद पडलेल्या एसटीवर जोरात जाऊन आदळली आणि भीषण अपघात घडला.


दरम्यान, या मॅक्झिमो गाडीमध्ये जवळपास १३ प्रवासी होते. त्यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. (Pune Accident)

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात