मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन ३१ जानेवारीपर्यंत सुपूर्द करणार

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी ३१ जानेवारीपर्यंत ५.२५ एकर जमिनीचा भाग सुपूर्द करणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.


राज्य सरकारने न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, पहिल्या टप्प्यात ४.३९ एकर जमीन ऑक्टोबर २०२४ मध्ये उच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यातील ५.२५ एकर जमिनीचा ताबा डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत देण्यात येणार होती. मात्र काही अडचणींमुळे जमीन हस्तांतरण झाले नाही.



महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले की, ५.२५ एकर जमीन ताब्यात देण्यासाठी पावले उचलण्यात आली असून अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. आम्ही ३१ जानेवारीपर्यंत वेळ मागत आहोत, या मुदतीत जमीन हस्तांतरित केली जाईल, असे सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.


महाधिवक्ता म्हणाले की, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी देखील पावले उचलली गेली आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ते उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या संकुलाच्या बांधकामासाठी डिसेंबरपर्यंत जमिनीचा पुढील भाग सुपूर्द करतील. राज्य सरकारने ३०.१६ एकर जमिनीचा ताबा टप्प्याटप्प्याने उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला जाईल, असे सांगितले होते.

Comments
Add Comment

माहीम मध्ये पुन्हा सुरू झालाय ‘सी फूड प्लाझा'

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून

ऐन दिवाळीत वाढीव बोनस साठी बेस्ट आणि अदानीच्या कर्मचाऱ्यांचा इशारा

मुंबई: दिवाळी अगदी तोंडावर आलेली असतानाच मुंबईकरांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. बेस्ट उपक्रम आणि अदानी

मेट्रो स्टेशनवर आता मोफत वाय-फाय!

मुंबई : भूमिगत मेट्रो लाईन-३ मध्ये मोबाइल नेटवर्क (फोनचे नेटवर्क) चांगले मिळत नसल्याच्या अनेक प्रवाशांच्या

ऐतिहासिक! ‘झवेरी बाजार’चा मुख्य रस्ता आता फक्त चालण्यासाठी खुला!

मुंबई : मुंबईतील खूप प्रसिद्ध असलेल्या झवेरी बाजारातून थेट मुंबादेवी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता, बाजाराच्या

Diwali Shopping : दादर मार्केटमध्ये 'महागर्दी'; चेंगराचेंगरीची भीती!

मुंबई: मुंबईतील सर्वात लोकप्रिय खरेदीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या दादर मार्केटने, दिवाळीपूर्वी खरेदीदारांचा

एसटी बँकेच्या बैठकीत तुफान हाणामारी!

एसटी सहकारी बँकेच्या बोर्ड बैठकीत सदावर्ते विरुद्ध शिंदे गट हाणामारी; बाटल्या फेकल्या, खुर्च्या