Valmik Karad : वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडवर (Valmik Karad) मकोका लावण्यात आला. त्यानंतर आता बीड न्यायालयाकडून वाल्मिक कराडला आज सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली.


एसआयटीतर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी आज संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला. दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही यावेळी करण्यात आला. परिणामी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एसआयटीने १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने सात दिवसांची एसआयटी कोठडी दिली. त्यामुळे येत्या २२ जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडचा मुक्काम एसआयटी कोठडीत असणार आहे.



दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या ९ डिसेंबर रोजी झाली, त्यादिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले. या दरम्यान तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास एसआयटीला करायचा आहे. तसेच वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, या प्रकरणात पुढे आलेल्या माहितीनुसार, विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे. यात विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये काही परस्पर संबंध काय आहेत? याची माहिती घेण्यात आली. तसेच फरार आरोपी अजून सापडायचा आहे त्या कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे गेले अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? अशा अनेक गोष्टींचा उलगडा तपास यंत्रणेला करायचा आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण