Saturday, February 8, 2025
Homeक्रीडाखो खो विश्वचषकासाठी भारत सज्ज

खो खो विश्वचषकासाठी भारत सज्ज

नवी दिल्ली : खो खो विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारत – नेपाळ या सामन्याने खो खो विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे. याआधी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यंदाच्या खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष गटात २० आणि महिला गटात १९ संघ आहेत.

IPL 2025: आयपीएल २०२५ हंगामाच्या तारखेची घोषणा, या तारखेपासून सुरू होणार सामने

खो खो विश्वचषक २०२५ – स्पर्धेसाठी संघांची गटवारी

पुरुष
अ गट – भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट – दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
क गट – बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट – इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया

महिला
अ गट – भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स
क गट – नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया

Jasprit Bumrah: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आली ही बातमी

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघ : प्रतिक वायकर(कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो , सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर., सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनु, मोनिका, नाझिया बीबी. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : संपदा मोरे, रितिका सिलोरिया, प्रियांका भोपी.

इंग्लंड विरूद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघाचे सामने

सोमवार १३ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध नेपाळ
मंगळवार १४ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध ब्राझील
बुधवार १५ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध पेरू
गुरुवार १६ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध भूतान

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघाचे सामने

मंगळवार १४ जनेवारी २०२४ – भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
बुधवार १५ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध इराण
गुरुवार १६ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध मलेशिया

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा कधी आणि कुठे होणार ?

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून भारतात सुरू होत आहे. अंतिम सामने १९ जानेवारी रोजी आहेत. दिल्लीचे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि उत्तर प्रदेशमधील नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. पुरुषांची खो खो विश्वचषक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला निळ्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. तर महिलांची खो खो विश्वचषक स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या महिला संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शन येथे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -