२०२५ मध्ये विजयाची सुरूवात दिल्ली भाजप करेल - अमित शाह

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले


शिर्डी :२०२४ चा शेवट महाराष्ट्र भाजपने केला आणि आता २०२५ मध्ये विजयाची सुरूवात दिल्ली भाजप करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी व्यक्त केला. शिर्डीत आयोजित भाजपच्या महाविजय प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या.

अमित शाह यांनी आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. पंचायत ते संसद असा नारा त्यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीत विजय झाला असला तरी आता जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपला विजय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शाहांनी यावेळी केले. आता विधानसभेत आणि संसदेत भाजप आहे. पक्षाची दीड कोटी सदस्य नोंदणी लवकरात लवकर करून आगामी निवडणुकीसाठी पुन्हा जनतेच्या दारोदारी जाऊन सरकारच्या योजना पोहोचवा, असे निर्देश अमित शाह यांनी दिले. आपल्याशी धोका करण्याची पुन्हा कुणाची हिम्मत होऊ नये, यासाठी आपल्याला पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे.आता आपले पुढचे लक्ष्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचे आहे. येत्या जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीत विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका. पंचायत ते संसद भाजपच असली पाहिजे. तब्बल तीन दशकानंतर महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला १३० हून अधिक जागा जिंकल्या आल्या आहेत, अर्थात तो पक्ष आहे भाजप… विधानसभेत ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या खांद्यावर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यासाठी भाजपचे शिर्डीत अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी महत्त्वाच्या महापालिका आणि त्याबरोबरच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रातील महाविजयानंतर पहिल्यांदाच आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. तुम्हा सर्वांना कल्पना नाही की, तुम्ही किती मोठं काम केलं आहे. तुम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते आमदार बनले, मंत्री बनले. आपले सहकारी पक्ष खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही विजय मिळाला. परंतु महाराष्ट्रातील या विजय अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं. त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत जो द्रोह केला होता, २०१९ मध्ये विचारधारा सोडली होती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांना सोडलं होतं. खोटं बोलून, विश्वासघात करून मुख्यमंत्री बनले होते. त्या उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांची जागा दाखण्याचं काम केलं. नेहमीच १८७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र अस्थिरतेचं शिकार होतं. त्या अस्थिरतेच्या राजकारणाला समाप्त करून, एका स्थिर मार्गावर चालण्याचं काम, एक मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देऊन तुम्ही केलं आहे. याचसोबत हिंदुत्व आणि मोदींचं विकासाचं राजकारण देखील आहेच.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. हरियाणा, सिक्कीम, महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा भाजपला जनादेश मिळाला. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली, आंध्र प्रदेशात एनडीएला पहिल्यांदाच बहुमत मिळाले.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात