पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत (MSRTC) पुणे विभागाच्या (Pune News) ताफ्यात येत्या वर्षभरात २०० इलेक्ट्रिक बस (Electric Bus) येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पूर्वीपेक्षा जास्त बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित स्वारगेट, दापोडी ‘चार्जिंग स्टेशन्स’वर एकाच वेळी ३६ बस चार्ज होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये एकमक सुरुच! ३ नक्षलवादी ठार
केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार, आयुर्मान संपलेली १५ वर्षांपुढील सरकारी वाहने मोडीत काढण्यात येत आहेत. तसेच, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार, राज्य सरकारनेही एसटी महामंडळातील जुन्या बस मोडीत काढून इलेक्ट्रिक बस वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे, एसटी महामंडळात येत्या वर्षभरात पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या वर्षभरात पुणे विभागात २०० इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होतील. सध्या पुणे विभागात ६६ इलेक्ट्रिक बस आहेत. या बसचे चार्जिंग शंकरशेठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी होते. अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे किंवा चार्जिंगसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने बसचे वेळापत्रक कोलमडते व प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांमध्ये ‘चार्जिंग स्टेशन’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे पुणे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले.
पुणे विभागांतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर मार्गांवर ई-शिवाई सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सातारा मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. सोलापूर मार्गावरून धावणाऱ्या बस शंकरशेठ रस्त्यावरील चार्जिंग स्टेशनवर, कोल्हापूर, सातारा सांगली मार्गावरून येणाऱ्या बस स्वारगेट येथील ‘चार्जिंग स्टेशन’ येथे चार्ज होतील, तर नाशिक धुळे, तसेच उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या बस दापोडी येथील ‘चार्जिंग स्टेशन’मध्ये चार्ज होतील. त्यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात येत आहे.