विजापूर : छत्तीसगडमध्ये चकमकीचे (Chhattisgarh Encounter) सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासूनही छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ३ नक्षलवादी ठार झाले असून शस्त्रे, स्फोटके आणि स्वयंचलित शस्त्रे यासह नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी सकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक सुरू झाली. यावेळी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान दिले आहे. सध्या सुरक्षा रक्षकांकडून नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे.