Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीUday Samant : ...या सगळ्याचे फटके बसल्यामुळे उबाठा गटाने स्वबळाचा निर्णय घेतला!

Uday Samant : …या सगळ्याचे फटके बसल्यामुळे उबाठा गटाने स्वबळाचा निर्णय घेतला!

मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता पालिका निवडणुकांना (Municipal Election) सुरुवात होणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी सुरु असताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना या विधानावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलाच टोला लगावला आहे.

Sesame Price Hike : मकरसंक्रातीच्या गोडव्यात महागाईचा कडवटपणा! तिळाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

महाविकास आघाडीत नेमके काय सुरू आहे, हे त्यांच्या मतदारांना देखील कळत नाही. २०१९ला शिवसेनेला बहुमत मिळालेले असताना ते दुसऱ्याबरोबर म्हणजे काँग्रेसबरोबर गेले. त्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणे, म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यात हाताचा प्रचार शिवसेनेकडून कधीही होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांचा प्रचार करणे. भाषणात हिंदूह्रदयसम्राट शब्द न वापरणे, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून उबाठा गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

त्याचबरोबर, उबाठा गटातील नेत्यांना काही गोष्टींची जाणीव झाली असल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहेत. तसेच सत्तेत येण्यासाठी खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांकडे आता मुख्यमंत्र्यांजवळ जाण्याशिवाय पर्याय नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -