गेवराई : इंग्रजी नववर्ष सुरु होताच येणारा पहिला सण म्हणजेच मकरसंक्रात. यंदाची मकरसंक्रात (Makarsankrat 2025) अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. हळदीकुंकवाचे वाण तसेच पतंग घेण्यासाठी ग्राहकांची बाजारात मोठी रेलचेल असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशातच मकरसंक्रातीत महत्त्वाचे असणाऱ्या तिळाच्या लाडूचा गोडवा कमी होणार आहे. मकरसंक्रातीत तिळाची मोठी मागणी पाहता अचानक तिळाच्या किमतीत वाढ (Sesame Price Hike) झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या तोंडावर दीडशे रुपये किलो मिळणाऱ्या तिळाच्या भावात अचानक ४०-५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्यापूर्वी १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा तीळ आता संक्रांतीत किरकोळ बाजारात २०० रुपये किलोने विकला जात आहे.
दरम्यान, सातत्याने जीवनावश्यक वस्तू महागल्याने गृहिणी त्रस्त आहेत. त्यातच आता मकरसंक्रांतीला तिळाचे भाव वाढल्याने सणाचा गोडवा कमी झाला आहे.