Sunday, January 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजKankavli : कणकवलीच्या विकासासाठी लागेल तो निधी देणार

Kankavli : कणकवलीच्या विकासासाठी लागेल तो निधी देणार

मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

कणकवली पर्यटन महोत्सवाचे झाले शानदार उद्घाटन

कणकवली : कणकवली नगरपंचायतची सत्ता माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मागताना कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे, याची प्रचिती कणकवली शहरात फिरताना जनतेला येत आहे. मी आमदार असताना कणकवलीच्या विकासासाठी किती काम केले आहे हे तुम्ही पाहिले आहेच. आता मी मंत्री झाल्यामुळे कणकवलीच्या विकासाचा तुम्ही नियोजन आराखडा बनवा, त्यासाठी लागेल तो निधी देण्याची जबाबदारी माझी असेल असे आश्वासन राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

कणकवली पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक अभि मुसळे, विराज भोसले, बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर, संजय कामतेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी केली. त्यामुळे राणे कुटुंबाची कणकवली ही शहरामुळे ओळख आहे. कणकवली चे नाव राज्यात आणि देशात उंचावण्याची जबाबदारी आमची आहे. पर्यटन कणकवली पर्यटन महोत्सव च्या माध्यमातून टीव्हीवर दिसणारे देशातील दिग्गज कलाकार प्रत्यक्ष पहाणे, त्यांची कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी जनतेला मिळते.

Buldhana Hair Fall Reason : बुलढाण्यातील लोकांचे केस गाळण्यामागे ‘हे’ आहे कारण

कणकवली पर्यटन महोत्सव आता ब्रँड तयार झाला आहे. कणकवली नगरपंचायतची सत्ता माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मागताना कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे, याची प्रचिती कणकवली शहरात फिरताना जनतेला येत आहे.

मी केवळ आमदार असताना पोदार इंटरनॅशनल स्कुल, जाणवली नदीवरील पूल, कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण, गार्डन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डीपी रोड, रिंग रोडचे जाळे उभारले. आता पुढील पाच वर्षांत विकासाचा आणखी पुढील टप्पा गाठण्याचा आमचा संकल्प आहे.

नगरपंचायत निवडणुका लागतील. तेव्हा विरोधक जागे होतील. पण आम्ही मात्र कणकवलीकरांच्या सेवेत कायम होतो आणि असणार. केंद्रात व राज्यात सत्ता आहे. खासदार देखील राणे साहेब आहेत. मी स्वतः कॅबिनेट मंत्री आहे. सिंधुदुर्गवर प्रेम करणारे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कणकवली शहराच्या ‘न भूतो’ अशा विकासासाठी निधीची कमतरता कधीच भासणार नाही असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, २००८ साली जेव्हा माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायतची सत्ता जनतेने निवडून दिली. तेव्हा खा. नारायण राणे यांनी कणकवली शहरात पर्यटन महोत्सव व्हायला पाहिजे. तेव्हापासून सत्ता असो किंवा नसो पर्यटन महोत्सवाचे आयोजन करत आहोत.

या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून कणकवली शहरातील स्थानिकांना रोजगार मिळत आहे. केवळ आमदार असताना मंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहराचा कायापालट मागील पाच वर्षात केला आहे. आता नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. आता कणकवली शहराचा जलदगतीने विकास होईल. असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा कै. सायली मालंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी आर. जे. पवार, पत्रकार रमेश जोगळे , नामदेव जाधव, प्रतिभा करंबेळकर, कृष्णा हुंनरे, गर्जना ढोल पथक यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. रिल्स स्पर्धेतील प्रथम आलेल्या अक्षय हेदुलकर, द्वितीय, सत्यवान गावकर, तिसरा राजेंद्र रावले , मिलिंद गुरव यांचा तर एडिटिंग साठी सचिन आणि प्रांजल यांचा सत्कार करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -