बुलढाणा : अवघ्या तीन दिवसात टक्कल पडत असल्याने केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे बुलढाण्यातील गावकरी भयभीत झाले होते. मात्र हे कोणत्याही शॅम्पू किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव नसून पाण्यातील नायट्रेट कमी झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यभरातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
बुलढाण्यातील शेगावात काही दिवसांपूर्वी अचानक डोक्याला खाज येऊन टक्कल पडण्याची धक्कादायक प्रकार समोर आला होता. हा आजार असावा किंवा नवा व्हायरस या भीतीने गावकरी भयभीत झाले होते. या प्रकाराला तब्बल ५१ जण बळी पडले असून स्त्रियाही याला अपवाद नाहीत. असे असले तरी हा प्रकार पाण्यातील नायट्रेट ५ पटीने कमी झाल्याने घडला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.