कल्याण : कल्याण स्टेशनजवळ होत असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायातून १३ महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या १३ महिलांचीही सुटका केली आहे.तक्रारींच्या आधारे कारवाई करत पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ छापा टाकला. यावेळी, तीन महिलांसह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील एसटी बस स्टॉपच्या मागे उघड्यावर बेकायदेशीरपणे हे काम सुरू होतं. या कारवाईत पोलिसांना बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे.
India Cricket Team Leader : रोहित शर्मा नंतर ‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार
घटनास्थळावरून १३ महिलांची सुटका करण्यात आली आणि अधिक सुरक्षिततेसाठी त्यांना उल्हासनगर येथील आश्रयगृहात पाठवण्यात आलं. सुटका केलेल्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, त्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलं आहे. या महिलांना समुपदेशन आणि सरकारी योजनांद्वारे मदत दिली जाईल.या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे आणि ते किती काळापासून चालवलं जात होतं याचाही तपास केला जात आहे.