मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मॅच दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे रोहितला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थित जसप्रीत बुमराहने टीमच्या नेतृत्वाची कामगिरी हाती घेतलीय. अशातच आता रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना सुनील गावसकर यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
गावसकरांच्या मते रोहित शर्मा नंतर भारतीय कसोटी संघाचा उत्तम कर्णधार जसप्रीत बुमराह होऊ शकतो. नुकताच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराह चमकला होता. त्याने त्याच्या गोलंदाजीने ३२ गडी बाद केले होते.
Black Dog Film : ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने उघडणार थर्ड आय आशियाई चित्रपटाचा पडदा
सुनील गावसकर यांनी माध्यमांशी चर्चा करताना म्हटले की, ‘ जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो. तो संघाची जबाबदारी घेऊन नेतृत्व करतो. त्याच्यात नेतृत्वाचे गुण आहेत. तो असा खेळाडू आहे, जो गरज नसताना तुमच्यावर दबाव टाकणार नाही. कधी कधी असे कर्णधार असतात, जे गरज नसताना खूप दबाव टाकतात. ज्याला जे काम दिलं गेलय त्याने तेच करावं, इतकीच अपेक्षा बुमराहला असते. प्रत्येक खेळाडूला आपला रोल माहीत असतो, त्याने तेच काम करावं. त्यासाठी बुमराह कुठलाही दबाव टाकत नाही.’
जसप्रीत बुमराह भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज आहे. त्याने शानदार गोलंदाजी करून भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. गावसकर म्हणाले, ‘ जसप्रीत बुमराह मिड ऑफ किंवा मिड ऑनला उभा राहतो. तो तिथे असणं हे गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. असे असले तरी क्रिकेट चाहत्यांचे कसोटी क्रिकेट दरम्यान भारताचा कर्णधार कोण असेल याकडे लक्ष लागले आहे.