Fake Body Spray Blast : बनावट 'बॉडी स्प्रे'चा स्फोट होऊन चार जण जखमी

नालासोपारा : 'बॉडी स्प्रे'चा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. 'बॉडी स्प्रे' वरील एक्सपायरी डेट बदलण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील तब्बल ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.



नालासोपारातील आचोळा येथील संकेश्वर नगर मधील रोशनी अपार्टमेंटच्या रूम नंबर ११२ येथे बॉडी स्प्रे बॉटल वरील संपलेल्या तारखा बदलण्याचे काम सुरू होते, त्याचवेळी घरात स्फोट झाला. हा कारखाना कोणत्याही कंपनीचा नसून बनावट सुगंधी द्रव्य ( बॉडी स्प्रे ) बनवणारा कारखाना होता. या स्फोटात पती पत्नीसह त्यांची दोन मुले गंभीर जखमी असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.