अकोला : पोस्टाच्या विविध बचत योजनांचे खातेदार वाढविण्यासाठी अकोला टपाल कार्यालयाने मोहिम हाती घेतली आहे. त्यादरम्यान पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेची (पीओएसबी) अधिकाधिक खाती नागरिकांनी उघडावीत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्रवर डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी शहरातील मुख्य टपाल कार्यालयात बुधवारी बैठक घेऊन याबाबत नियोजनाच्या सूचना केल्या. टपाल विभागाच्या बचत योजनांचे व्याजदर इतर संस्थांच्या तुलनेने अधिक आहेत. बचत खाते, आरडी, महिला सन्मान खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकासपत्र, जीवन विमा, ग्रामीण जीवन विमा अशा अनेक योजना आहेत.
या योजनांचा नागरिकांना लाभ मिळण्यासाठी दि. १३ ते १८ जानेवारीदरम्यान मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. अंभोरे यांनी केले.
बैठकीला सहायक अधीक्षक एन. एस. बावस्कार, गणेश सोनुने, वरिष्ठ पोस्टमास्तर शरद शेंडे, विपणन अधिकारी गजानन राऊत, तसेच शहरातील सर्व पोस्टमास्तर, बार्शिटाकळी, पातूर, पारस, निंबा, दहीहंडा, वाडेगाव येथील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…