जन्मदात्यानेच केला मुलीवर विनयभंग
डोंबिवली : कल्याण मधील चिमुकलीची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका वडिलांनी स्वतःच्याच मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे महिलांवरील वाढते अत्याचार आणि नेहमीच कानावर येणाऱ्या घटनांनी नक्की स्री कुठे सुरक्षित राहू शकते याबाबतीत शंका निर्माण होत आहे. ज्या वडिलांमुळे घराला आधार मिळतो त्याच वडील मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना डोंबिवलीत घडली आहे.
South Actor Ajith Kumar Accident : साऊथ अभिनेता अजित कुमारच्या कारचा भीषण अपघात
रविवारी ( दि ५ ) जानेवारी रोजी संध्याकाळच्या वेळेत मुलगी घरात एकटी होती. यावेळी वडिलांनी पीडित मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने विरोध केला असता नराधम बापाने शाळेची पुस्तके, कपडे जाळून टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. घडलेला हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. गेल्या सात दिवसाच्या कालावधीत दोन वेळा वडिलांनी माझ्यासोबत गैरप्रकार केला असल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. मानपाडा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने पती विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.