मुंबई : साऊथमधील सुप्रसिद्ध अभिनेता अजित कुमारचा दुबईमध्ये भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार रेसिंगचा सराव करत असताना हा अपघात झाला. अजित कुमार ताशी १८० किमी वेगाने कार चालवत होता. तरीही सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.
Vinod Kambli Wife : सचिन तेंडुलकरने दिलेली मदत विनोद कांबळीच्या बायकोने नाकारली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अजित कुमार पोर्श कार चालवताना दिसत आहे. 24H दुबई २०२५ कार रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो दुबईत गेला आहे. अजित कुमार ५३ वर्षीचा असून या शर्यतीसाठी ६ तास रेसिंग सराव करत होता.सराव संपणार असतानाच त्याची गाडी बॅरियरला धडकली आणि सात वेळा गोलगोल फिरली.
अजितचे पोर्श कारवरचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती गाडी रुटवरच सात-आठ वेळा फिरल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर ती बॅरियरला धडकली. असे असले तरी अजित कुमारला तात्काळ गाडीतून बाहेर काढण्यात आले. अभिनेत्याच्या या अपघातानंतर त्याच्या चाहता वर्गाला मात्र धक्का बसला आहे.