Nashamukt Navi Mumbai : भाज्यांच्या ट्रकमधून येतात नवी मुंबईत नशेचे पदार्थ! कॉलेज परिसरात सर्व काही मिळतं!

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर गणेश नाईकांची चौफेर फटकेबाजी!


नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस विभागाच्या अंतर्गत "नशामुक्त नवी मुंबई" (Nashamukt Navi Mumbai) अभियानाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), सिनेअभिनेते, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक आणि चौफेर फटकेबाजी करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.


गणेश नाईक म्हणाले की, नेताच जर चुकीचा असेल तर सगळी यंत्रणा त्याच मार्गाने जाते. हा माझा अनुभव आहे. शिंदेंच्या काळात देखील काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्यांची इच्छा नसताना. परंतु ती परिस्थिती आता बदलली आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला मंत्रिमंडळाने पाठिंबा दिलाय, असे नाईक यांनी स्पष्ट केले. नेतृत्व योग्य असेल तर यंत्रणा योग्य मार्गाने काम करते. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने निकाल-प्रेरित सुरुवात केली आहे. त्यांनी जुन्या परिस्थितींचा उल्लेख करत शिंदे यांच्या कारकिर्दीत काही चुका घडल्याचेही नमूद केले. परंतु सध्याच्या एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीमुळे राज्यात स्थैर्य आणि प्रगती दिसून येते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची रिजल्ट ओरिऐंटेड सुरूवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.



गणेश नाईक यांनी नशामुक्तीविषयी तरुण पिढीसमोर काही स्पष्ट विचार मांडले. पूर्वीच्या काळात सिगारेट ओढण्यासाठी अंधाऱ्या जागा शोधाव्या लागत. आज मात्र नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत, विशेषतः कॉलेज परिसरात. आता कॉलेजच्या बाहेर सर्व मिळतं. त्यावेळी फक्त तरूणच होते, आजच्या तरूणी देखील मागे राहिलेल्या नाहीत. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वत:वर अधिक बंधन घातली पाहिजेत. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसून स्वत:वर बंधन घालणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.



त्यांनी आणखी स्पष्ट केले की, सिगारेट, रम, दारू, जिन या नशा बकवास आहेत. माणसाने ध्येय पूर्ण करताना मनाशी बाळगलेली जी नशा येते, ती खरी नशा. दारू व सिगारेटसारख्या नशेपेक्षा ध्येय पूर्ण करण्याची नशा श्रेष्ठ असते. "मी दारू उत्पादन खात्याचा मंत्री होतो. या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे दुषण लावून घेण्यासारखं आहे. परंतु त्यातून राज्याला नशामुक्त करण्याचा विचार माझ्या मनात नेहमी होता," असेही त्यांनी सांगितले.


गणेश नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबई पोलिसांच्या विशेष प्रयत्नांमुळे नशा विरोधी अभियान (Nashamukt Navi Mumbai) नक्कीच यशस्वी होईल. एपीएमसी बाजारातून भाज्यांच्या ट्रकमधून नशेचे पदार्थ येत असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही ते रोखण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. तिथे एक व्यक्ती नेमलाय, त्यांच्या माध्यमातून हे पदार्थ पकडले जात आहेत. लवकरच नवी मुंबईला नशामुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,