'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतून वंदना गुप्ते प्रेक्षकांच्या भेटीला

  57

मुंबई : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत एक मोठा धमाका होणार आहे. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत धमाकेदार एन्ट्री होणार आह . त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्या भूमिकेचं नाव आहे 'गुरुमा'. गुरुमाच्या एन्ट्रीने जयश्रीची ही तारांबळ उडणार आहे. गुरुमा, एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच आकाशच्या बाबांची बहीण आहे. कुटुंबात त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहे.


जयश्री, गुरुमाची सर्व जबाबदारी वसुंधरावर सोपवते, तिला आशा आहे की वसुंधरा अपयशी ठरेल. वसुंधरा गुरुमा यांना प्रभावित करते आणि त्यांचा आदर मिळवते. गुरुमाच्या शिष्यांच आगमन होते तेव्हा वसुंधरा त्यांची काळजीही घेत. जयश्री आणि तनयाची कारस्थानं सुरूच आहेत. पण वसुंधराची प्रामाणिकता ह्यात उजवी ठरते. तनया, वसुंधरानी गुरुमासाठी तयार केलेलं जेवण दूषित करण्याचा प्रयत्न करते. पण वसुंधराच्या खरी माफी आणि चिकाटीमुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात.


गुरुमा वसुंधराला एक तपस्वी कार्य नियुक्त करतात. तर दुसरीकडे अखिल, एक महत्त्वाची बिझनेसची मिटिंग करत असताना, वसुंधरा आकाशला सांगते की त्या दिवशीच्या सर्व मिटिंग रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्याऐवजी मुलांसोबत एक पिकनिक आयोजित करण्याचा विचार करते. यामुळे तणाव निर्माण होतो तेव्हा आकाश आणि वसुंधरा यामध्ये वाद होतो. वसुंधरा अखेरीस त्या दिवशीची सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळून ऑनलाइन मीटिंग आयोजित करते आणि क्लायंटच्या समस्यांचे निराकरण करते. ऑनलाइन मीटिंगदरम्यान, वसुंधरा चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळते.


वसुंधराच्या आयुष्यात आलेल्या परीक्षेला कशी सामोरी जाईल आणि गुरुमाच मन कसंजिंकेल हे बघायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' सोमवार ते शनिवार संध्या. ६वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Comments
Add Comment

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड