Aeroindia 2025 : बंगळुरूत फेब्रुवारीत रंगणार एअर शो

बंगळुरू : मुंबईत निलगिरी फ्रिगेट, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात नौदलात दाखल होईल. यामुळे नौदलाचे बळ वाढेल. यानंतर काही दिवसांतच बंगळुरू येथे भारताच्या हवाई सामर्थ्याची झलक बघण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान येलहांका विमानतळावर एअर शो रंगणार आहे. एरो इंडिया २०२५ या नावाने हा एअर शो होणार आहे. या एअर शो च्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी कंपन्यांच्या भागीदारीला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. मागील काही वर्षांपासून सातत्याने हा प्रयोग सुरू आहे आणि त्याला हळूहळू यश येऊ लागले आहे. या निमित्ताने विमान उद्योगांशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान भारतात येऊ लागले आहे. भारताच्या विमान उद्योगाचा विस्तार होऊ लागला आहे.



यंदाच्या एअर शो मधील १०, ११ आणि १२ फेब्रुवारी हे तीन दिवस व्यावसायिक भागीदारी आवश्यक कार्यक्रमांकरिता असतील. तर १३ आणि १४ फेब्रुवारी या दोन दिवशी नागरिकांसाठी एअर शो चे आयोजन केले जाईल. हे एअर शो सामान्य नागरिकांना बघता येतील. या वर्षीच्या एरो इंडिया २०२५ मध्ये हवाई प्रात्यक्षिके आणि हवाई क्षेत्रातल्या व्यापक संरक्षण मंचाचे एका जागी मांडलेले प्रदर्शन यांचा समावेश असेल. पूर्वावलोकन, उद्घाटन समारंभ, संरक्षणमंत्र्यांचा परिसंवाद, सीईओंची गोलमेज परिषद, स्टार्ट-अप कार्यक्रम, चित्तथरारक प्रात्यक्षिके, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले एक विशाल प्रदर्शन आणि एरोस्पेस कंपन्यांचा व्यापारमेळा असे एरो इंडिया २०२५ चे स्वरुप असेल.



मित्र देशांसोबत संरक्षणविषयक धोरणात्मक भागीदारीबाबत संवाद सुरू करणे आणि वाढवणे यासाठी यंदाच्या एरो इंडिया कार्यक्रमात बिल्डिंग रेझिलिअन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एंगेजमेंट या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे यजमानपद भारताकडे असेल. एरो इंडिया २०२५ च्या निमित्ताने संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अशा उच्चपदस्थांसोबत निवडक द्विपक्षीय बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. मित्र देशांसोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नव्या दालनांचा शोध घेऊन त्यांच्यासोबतच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातल्या संबंधांना बळकटी देण्यावर यामध्ये भर देण्यात येईल.
Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे