दहा दिवसात चार लाख भाविकांनी घेतलं पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन

  84

सोलापूर : नववर्षाचे स्वागत अन् धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने आलेल्या ३ लाख ८२ हजार १३७ भाविकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने शनिवारी सकाळी पत्रकारांना दिली. या दहा दिवसाच्या काळात मंदिर समितीला २ कोटी ४१ लाख ५९ हजार २८७ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचेही मंदिर समितीने सांगितले.दरम्यान, एक दिवसाची ट्रिप करण्याचे फॅड वाढले आहे. त्यामुळे बहुतांश लोक सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर व गाणगापूर याठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेटी देतात.


यंदा सलग सुट्ट्या अन् नववर्षानिमित्त पर्यटनासाठी हजारो लोकांनी सोलापूरला पसंती दिली.पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे पंढरपुरातील वाहतूकीवर मोठा ताण दिसून आला. हॉटेल, लॉजेस, कॉटैज व मठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली.


नववर्षाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट केल्यामुळे मंदिराचं सौदर्य खुलले होते. पंढरपुरबरोबरच सोलापुरातील सिध्देश्वर मंदिर, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर, गाणगापूर येथील दत्त मंदिर व तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मागील दहा ते बारा दिवसात मोठमोठया रांगा लागल्याचेही दिसून आले.

Comments
Add Comment

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

ओबीसींचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

नागपूर : ओबीसी महासंघाकडून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे

मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के