कोलकाता : अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असले तरी त्यातही बस अपघाताचे प्रमाण जास्तच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची कन्या सना गांगुलीच्या गाडीचा कोलकाता येथे भीषण अपघात झाला. शुक्रवारी संध्याकाळी डायमंड हार्बर रोडवर बसने सना गांगुलीच्या कारला जोरदार धडक दिली असल्याची घटना घडली.
अपघातावेळी सना कारमध्ये उपस्थित होती आणि तिचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. धसनाच्या गाडीला धडक देऊन बस चालक पळून जात असताना. सनाने धाडसीपणा दाखवत बसचालकाचा पाठलाग केला. आणि बस चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातात कोणीही जखमी नसले तरी गाडीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.