मुंबई : कसारा येथील मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात, अतुलनीय टीमवर्क, समर्पण आणि माणुसकी दाखवून महत्त्वाची भूमिका बजावली. कसारा येथील आरपीएफ पोस्टला अंकित गर्ग, वरिष्ठ विभाग अभियंता/पर्मनंट वे यांच्याकडून रेल्वे रुळांच्या बाजूने ११०/४२ या पोल क्रमांकाजवळ कोणीतरी पडल्याचा संदेश प्राप्त झाला.
आरपीएफचे उपनिरीक्षक राम लखन कुमार त्यांच्या टीमसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. टीमने त्वरीत कारवाई करून त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे त्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, त्याच्या बॅगेची नियमित तपासणी केली असता त्या व्यक्तीचे नाव सोमनाथ एकनाथ शिंदे, इगतपुरी येथील रहिवासी आणि भांडुप युनिट क्रमांक १, ट्रॅक मेंटेनर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी असल्याचे उघड झाले.
https://prahaar.in/2025/01/04/two-more-murderers-in-sarpanch-santosh-deshmukh-case-arrested-in-pune-main-accused-in-police-custody/
शिंदे यांनी तपास पथकाला माहिती दिली की, तो ड्युटीवरून घरी परतत असताना उंबरमाळी येथे उतरला होता आणि महामार्गावर उभा असताना त्याला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून लुटले, त्यानंतर त्यांनी त्याला रेल्वे रुळालगतच्या खांबाजवळ फेकून दिले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला अंतर्गत जखमा आढळून आल्या आणि त्यानुसार त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक राम लखन कुमार, हेड कॉन्स्टेबल संतोष बागुल आणि अधिकृत वाहन चालक महिपाल पंडित यांचा समावेश असलेल्या RPF च्या टीमने एकाचा जीव वाचवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. आरपीएफ टीम “जीवन रक्षक” या बिरुदावलीस पात्र ठरली आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…